सातारा : मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच पोलिसांनी आता इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांवरही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गुरुवारी सायंकाळी गोडोली, स्वराज्यनगर, इंदिरानगर, चारभिंती, विलासपूर परिसरात इव्हिनिंग वॉक करणाऱ्या 26 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सातारा शहर पोलिसांचे एक पथक गरुवारी सायंकाळी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना वरील ठिकाणी काहीजण इव्हिनिंग वॉक करत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन संबंधितांना ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.