वाई : ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ वाई पालिकेच्यावतीने नागरिकांना देण्यात आला. महात्मा फुले भाजी मंडईतील आबासाहेब वीर व्यासपीठ येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गरिबांसाठी मूलभूत सुविधा, 80 कोटी भारतीयांना अन्नसुरक्षेची हमी, जनधन योजना, दुर्बल घटकांच्या आकांक्षांची पूर्तता व हक्कांचे सरंक्षण, दिव्यांग सक्षमीकरण, अनुसूचित प्रवर्गाच्या विकासाची सुनिश्चिती, तीन कोटींहून अधिक गरीब नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, स्वस्त किमतीतील घरे, पीएम उज्ज्वला योजना, आधारकार्ड, हेल्थ कार्ड, आयुष्मान कार्ड या योजनांची माहिती जिल्हा नोडल अधिकारी किशोर खडकीकर, समन्वयक साई कदम, सुनील यादव, राजू भारती यांनी चित्रफितीद्वारे दिली.
पीएम स्वनिधी अंतर्गत सात योजना, प्रधानमंत्री नागरी आवास योजनांचा लाभ घेण्यासाठी सादर करायची कागदपत्रे आणि आतापर्यंत या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी दिली. यावेळी हेल्थ कार्ड, आयुष्मान कार्ड, पीएम स्वनिधी या योजनांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या लाभार्थी व नागरिकांनी ‘आपला संकल्प विकसित भारत’ ही शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर, पत्रकार भद्रेश भाटे, दत्तात्रय मर्ढेकर, अनिल काटे, संजू वरे, बाळासाहेब सणस, विश्वास पवार, कुमार पवार, धनजंय घोडके, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष श्रीमती घैसास, नगरपरिषद कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी
सभा अधीक्षक राजाराम जाधव, पाणीपुरवठा अभियंता क्रांती वाघमळे, प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब कांबळे, मनोज बारटक्के, स्थापत्य अभियंता सौ. दीपाली साबळे, लेखापाल तानाजी गुरव, आरोग्य निरीक्षक सागर सरतापे, पीएम स्वनिधी प्रमुख जयश्री भोईर, संगणक अभियंता राहुल शेंडगे, पीएमवाय अभियंता नितीन जाधव, नगररचनाकार सर्वेश खाडे, अनंत बारस्कर, जितेंद्र वंजारी, नवीन कांबळे, प्रदीप कांबळे, शुभांगी हिरवे, कविता मुळीक, शहर समन्वयक परमार, नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक विकास जाधव, रियाज पटेल, दिलीप पवार, सौ. दिव्या गुजर, आरोग्य पर्यवेक्षक योगेश गाडे, उमेश कांबळे, राहुल गाडे, वीरेंद्र कांबळे, दिशा अॅकॅडमीचे नितीन जाधव उपस्थित होते. विकास जाधव यांनी सूत्रसंचालन करून, आभार मानले.
===============