विखळेच्या भोसले कृषी उद्योग समूहाची बैलगाडी प्रथम क्रमाकांची मानकरी
नागठाणे – सातारा तालुक्यातील नागठाणे येथे उपसरपंच अनिल साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील काकासाहेब युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती तब्बल 600 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. हजारो शर्यत शौकिनांच्या उपस्थितीत झालेल्या या शर्यतीत विखळे येथील भोसले कृषी उद्योग समुहाच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे हिरो मोटार सायकलचे बक्षीस पटकावत बाजी मारली.
या बैलगाडा शर्यतींसाठी 600 बैलगाडा स्पर्धकांच्या नोंदणीमुळे या स्पर्धेला भव्य स्वरुप प्राप्त झाले होते. नागठाण्यातील बैलबाजार तळावर भाऊबीजेच्या दिवशी हा शर्यतीचा थरार अनेक बैलगाडा शौकीनांना अनुभवायला मिळाला. उपसरपंच अनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी नेटके नियोजन, अटी व नियमांचे पालन करून या शर्यती पार पडल्या.
यावेळी अजिंक्यतारा सह साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन यशवंत हरी साळुंखे, माजी सरपंच बबन साळुंखे, दत्तात्रय कुलकर्णी वकील, माजी चेअरमन विकास सोसायटी दत्तात्रय साळुंखे, युवा उद्योजक नितीन साळुंखे, नागठाणे पत्रकार संघाचे सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक हिरो मोटारसायकलचे मानकरी ठरले भोसले कृषिउद्योग समुह विखळे,(मालक राजु शेठ जवळेकर पुणे), तर द्वितीय क्रमांक वडजाई प्रसन्न चव्हाण, वाकुमामा प्रसन्न (मुरलीधर शेडगे) चितळी, तृतीय क्रमांक संयुक्त सिद्धनाथ प्रसन्न (प्राची पवार सातारा), चतुर्थ क्रमांक विराज विजय माने, ओझर्डे आणि पाचवा क्रमांक रमेश ड्रायव्हर शिरगाव, भैरवनाथ प्रसन्न शिवडे जिवन ड्रायव्हर निनाम, सहावा क्रमांक पार्थ प्रविण म्हात्रे, कोणेगाव, सातवा क्रमांक हॉटेल जलसागर (महेश आप्पा काळगावकर),
नववा क्रमांक हिंदवी विजय मतकर यांचा आला. स्पर्धा पार पाडण्यासाठी काकासाहेब युवा प्रतिष्ठानचे सर्व युवक व नागठाणे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. झेंडा पंच म्हणून धनावडे बापु कोरेगावकर, सोमनाथ जगदाळे यांनी काम पाहिले. विकास कुमठेकर यांनी आपल्या मधुर वाणीने शर्यतीचे समालोचन केले. किरण भिसे, चेतन इनामदार अपशिंगे यांनी पंच म्हणून काम पाहिले.