पुणे -इंदापूर आणि बारामती तालुक्यात गवताळ सफारी यशस्वीपणे राबविल्यानंतर आता वनविभागाने बारामती तालुक्यातही दुसरी सफारी योजना सुरू केली आहे. बारामतीतील गाडीखेल गावात “वन्यजीव’ सफारी अनुभवयाला मिळणार आहे. जिथे निसर्गप्रेमींना बिबट्यांसह पाच वेगवेगळ्या प्रकारच्या वन्यजीव प्रजाती पाहायला मिळतील.
अलीकडेच वनविभागाने वास्तुविशारदाची नियुक्ती केली आहे, जो या वन्यजीव सफारीची रचना करेल आणि प्रत्यक्ष काम पुढील वर्षीच्या सुरुवातीला सुरू होईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बारामतीत राबवता येईल, अशी वन्यजीव सफारीची योजना वनविभागाने आणली आहे. त्यानुसार, विभागाकडून त्यासाठी अंमलबजावणी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
आराखडा अंतिम करणे, निधी वाटप, आणि इतर कामांना किमान तीन ते चार महिने लागतील. प्रत्यक्ष काम एप्रिलमध्ये सुरू होणे अपेक्षित असल्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले.
सफारीचे तपशील
एकूण क्षेत्र – 250 ते 300 हेक्टर
प्रदर्शनासाठी वन्यजीव प्रजातींची संख्या – पाच
कुत्रा, मांजर कुटुंबातील प्रजाती, देशी पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश