सातारा – भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागमार्फत परिसंवाद आणि मराठवाडा इतिहास परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन दि. 12 व 13 जानेवारी 2024 रोजी बॅरिस्टर पी. जी. पाटील सभागृहात होणार आहे.
या अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडातील इतिहासावर शोधनिबंधांचे वाचन आणि अधिवेशनात शुक्रवार, दि.12 जानेवारी रोजी दुपारी 12.30 राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त परिसंवद होणार आहे. यामध्ये पत्रकार शिवाजी राऊत, विजय मांडके व डॉ. भारतभूषण माळी सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकीहाळ अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी दिली.