Sara Tendulkar : टीम इंडियाचा युवा क्रिकेटर शुभमन गिलने (Shubman Gill) अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियाचा उदयोन्मुख फलंदाज शुभमन गिल खेळाबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो. विशेषत: त्याचे चाहते व क्रिकेटप्रेमींमध्ये त्याच्या अफेअरची चर्चा अधिक असते.
गेल्या काही दिवसांपासून तो भारताचा माजी क्रिकेटपटू विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरची मुलगी साराला (Sara Tendulkar) डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. आज भारत विरुद्ध न्यूझिलँड सामन्यादरम्यान सारानं सगळं ऑफिशिअली सांगून टाकलं आहे? अशा चर्चा पाहायला मिळालं.
Match Day. Hope IND wins ❤️🔥 Play well My Man #ShubmanGill 🇮🇳💙#INDvsNZ pic.twitter.com/deLSufvzb5
— Sara Tendulkar (@SaraTendulkar__) November 15, 2023
या चर्चांचं कारण ठरलं ते म्हणजे साराचं एक ट्विट. यामध्ये तिनं शुभमन गिलला उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच, भारत विरुद्ध न्यूझिलँड सामन्यात भारतानं जिंकावं..’ महत्त्वाचं म्हणजे सारानं पहिल्यांदा शुभमन गिलचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे.
सारानं केलेल्या ट्विटमध्ये तिनं म्हटलंय, “Match Day. Hope IND wins. Play well My Man #ShubmanGill”. सारानं या पोस्टबरोबर ब्लू हार्ट इमोजी आणि इंडियाचा फ्लॉग इमोजी देखील शेअर केला आहे. सारानं शुभमन गिलसाठी लिहिलेल्या Play well My Man या वाक्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
साराचं हे ट्वीट पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला पण हे ट्वीट ज्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं ते सारा तेंडुलकरचं ऑफिशिअल अकाऊंट नाहीये. सारा तेंडूलकरच्या Parody अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं आहे.