क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. यावेळी पती विराट कोहलीचे (Virat kohali) मनोबल वाढवण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माही पोहोचली. विराट कोहलीच्या प्रत्येक शॉटवर अभिनेत्री चीअर करताना दिसली. खेळपट्टीवर शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीची अनोखी सेलिब्रेशन स्टाईल सर्वांना दिसली. तसे पाहता, सामन्यादरम्यानची एक व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्काचा (Anushka Sharma) रोमँटिक अंदाज दिसत आहे.
Virushka moment at Wankhede Stadium. 😭❤️@imVkohli • @AnushkaSharma • #ViratGang pic.twitter.com/hz38BZwjuX
— ViratGang.in (@ViratGangIN) November 15, 2023
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीने केलेली कृती चाहत्यांना देखील आवडली आहे. खरंतर विराट यावेळी अभिनेत्रीला फ्लाइंग किस देतो. प्रत्युत्तरात अनुष्कानेही लाजत तिच्या नवऱ्याला फ्लाइंग किस दिला. हा व्हिडीओ मॅच सुरु होण्यापूर्वीचा आहे. (Virat flaing kiss to anushka)
याशिवाय या सामन्यात विराट कोहलीने कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावल्यावर आणखी एक प्रतिक्रियाही पाहायला मिळाली. विराटच्या फ्लाइंग किसला अभिनेत्रीने फ्लाइंग किसने प्रत्युत्तर दिले. पतीने शतक झळकावताच अभिनेत्री खूप उत्साहित झाली. यादरम्यान सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड बेकहॅम देखील विराटला चिअरअप करताना दिसले.आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मात्र, या वर्ल्डकपमध्ये अनुष्का पती विराट कोहलीसाठी खूप लकी ठरली आहे. अनेक सामन्यांमध्ये ही अभिनेत्री आपल्या पतीला चिअरअप करताना दिसली.
LADY LUCK 🤍📌
They Celebrate it together #anushkasharma #ViratKohli𓃵 #INDvsNZ pic.twitter.com/lt5ktcS5Dm— 🌙.Anu (@Rra_Anushka) November 15, 2023
6 वर्षांपूर्वी लग्न झाले
अनेक वर्षे डेट केल्यानंतर अनुष्का आणि विराटने 2017 मध्ये इटलीमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये त्यांची मुलगी वामिकाचे कुटुंबात स्वागत केले. अनेक मॅचमध्ये अनुष्का विराटला प्रोत्साहन देण्यासाठी येते.