बाबर आझमने (Babar Azam) पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने बुधवारी एका नोटद्वारे राजीनामा दिला. त्यात त्यांनी लिहिले की, हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. बाबरने संधी दिल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) आभार मानले आहेत.
बाबरने आपल्या नोटमध्ये लिहिले- मला तो क्षण चांगला आठवतो जेव्हा मला पीसीबीकडून २०१९ मध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करण्याचा कॉल आला. गेल्या चार वर्षांत, मी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चढ-उतार अनुभवले आहेत, परंतु मी मनापासून आणि पूर्ण समर्पणाने पाकिस्तानचा अभिमान आणि सन्मान राखण्याचे ध्येय ठेवले आहे. क्रिकेट जगतात पाकिस्तानला कसोटीत पहिल्या क्रमांकावर नेणे हे खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ होते, परंतु या प्रवासात पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या अतुट पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो.(Babar Azam resigned as captain)
बाबरने लिहिले,”आज मी सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा एक कठीण निर्णय आहे, परंतु मला वाटते की या निर्णयासाठी हीच योग्य वेळ आहे. मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून पाकिस्तान टीमचा सदस्य राहीन. माझ्या अनुभवाने आणि समर्पणाने नवीन कर्णधार आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी मी येथे आहे. माझ्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मनापासून आभार मानू इच्छितो.(Pak Cricket Team )
विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबरने कर्णधारपद सोडल्याची चर्चा होती. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि बाबर आझम यांच्यातही चर्चा होत नव्हती. यानंतर मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांनी स्पर्धेच्या मध्यभागी राजीनामा दिला. यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर पीसीबीने संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. आता मिकी आर्थरच्या नेतृत्वाखालील कोचिंग पॅनल बरखास्त केल्याची चर्चा आहे.