Sara Tendulkar – सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डीपफेक फोटोंवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. साराने इंस्टाग्राम पोस्टद्वारे डीपफेक फोटोवर आपली भूमिका आपले मत व्यक्त केले. मात्र, काही वेळाने सारानेही तिची पोस्ट डिलीट केली.
शुभमनसोबतचा फेक फोटो शेअर केल्याने सारा संतापली
साराने तिच्या चाहत्यांना एक्स (ट्विटर) वर उपस्थित असलेल्या बनावट खात्यांबद्दल सांगितले की,’तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापरामुळे ती त्रस्त आहे. तिच्या स्टोरीमध्ये, साराने X हँडलवर असलेल्या @SaraTendulkar__ नावाच्या बनावट प्रोफाइलला लक्ष्य केले, ज्याचे 2.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. साराची छायाचित्रे आणि व्हिडिओ या अकाऊंटवरून अनेकदा पोस्ट केले जातात आणि तिच्याबाबत अफवा असलेला बॉयफ्रेंड आणि टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिलसोबतचे फोटोदेखील या पेजवरून पोस्ट केले जातात.
साराने बनावट खाती निलंबित करण्याची केली मागणी
साराने लिहिले, “सोशल मीडिया हे आपल्या सर्वांसाठी आपले सुख, दु:ख आणि उपक्रम शेअर करण्याची जागा आहे. मात्र तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर करणे चिंताजनक आहे कारण तंत्रज्ञानाचा गैरवापर इंटरनेटची विश्वासार्हता नष्ट करत आहे. माझे डीपफेक फोटो व्हायरल झाले आहे. अशा पोस्ट आल्या आहेत ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. X वर काही खाती लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तयार केली गेली आहेत. माझ्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर खाते चालविले जात आहे अशी सर्व बनावट खाती निलंबित करावी.’