Amruta Khanwilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत देखील तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासह तिच्या नृत्य शेलीने अमृताने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. ‘वाजले की बारा’ या गाण्यामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आज 23 नोव्हेंनबर रोजी अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती हिमांशू मल्होत्राने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृताच्या वाढदिवसानिमित्त हिमांशूने खास पोस्ट शेअर केली आहे. यात तो लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! अमू तू माझ्या आयुष्यात कायम महत्त्वाची आहे आणि राहशील. शेवटपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे.” त्याच्या पोस्टवर अमृताने देखील कमेंट करत लिहिले की, “खूप खूप थँक्यू, गेली 20 वर्ष आपण एकत्र वाढदिवस साजरा करत आहोत.”
View this post on Instagram
अमृता-हिमांशूने ‘नच बलिए’च्या सातव्या पर्वात एकत्र सहभाग घेतला होता. हिमांशू गेली अनेक वर्ष तिचा वाढदिवस संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर साजरा करतो. याबाबत त्याने या कार्यक्रमात खुलासा केला होता. हिमांशू लाडक्या बायकोला 1 ते 23 नोव्हेंबरपर्यंत रोज 23 गिफ्ट्स देतो, असा खुलासा अमृताने ‘नच बलिए’च्या रंगमंचावर केला होता.
हिमांशू आणि अमृताने जवळपास 10 ते 12 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2015 मध्ये लग्न केलं. दरम्यान, अमृता खानविलकरने 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमातून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पाऊल ठेवले. त्यानंतर आता ती ‘कलावती’ आणि ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटांद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.