Shubman Gill vs James Anderson : धर्मशाला कसोटीत शुभमन गिल शतकी खेळी नंतर बाद झाला. टीम इंडियासाठी फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात 110 धावा केल्या. शुभमनच्या या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या डावात 63व्या षटकात गिलला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने क्लीन बोल्ड करत बाद केले.
अँडरसनने त्याला यापूर्वीही अनेकदा बाद केले आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर गिल आणि अँडरसन यांच्यात अप्रतिम स्पर्धा राहिली आहे. जेम्स अँडरसनने शुभमनविरुद्ध कसोटीत आतापर्यंत 166 चेंडू टाकले आहेत. या कालावधीत गिलने 91 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 16 चौकार आणि फक्त एक षटकार मारला आहे. तर अँडरसनने आतापर्यंत शुभमनला कसोटीत 6 वेळा बाद केले आहे.
अँडरसनने याआधी दुसऱ्या कसोटीतही गिलचा बळी घेतला होता. विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाच्या पहिल्या डावात 34 धावा करून गिल बाद झाला. त्याने 46 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले.
शुभमन गिलची इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील कामगिरीवर नजर टाकली, तर ती चांगलीच राहिली आहे. गिलने 10 कसोटी सामन्यांच्या 18 डावात 592 धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. या काळात गिलची सर्वोत्तम धावसंख्या 110 धावा आहे. गिलने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 डावात 444 धावा केल्या आहेत.
IND vs ENG 5th Test Day 2 : टीम इंडियाला 403 वर पाचवा धक्का, सरफराजनंतर पडिक्कलही परतला माघारी…
शुभमनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत 1492 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 4 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत. गिलची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 128 धावा आहे. त्याने प्रथम श्रेणीतही चांगली कामगिरी केली आहे. गिलने 89 डावात 3,924 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 11 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत. त्याने द्विशतकही झळकावले आहे. गिलची सर्वोत्तम धावसंख्या 268 धावा आहे.