Entertainment : सारा अली खान (Sara ali khan) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) या दोन्ही अभिनेत्रींनी अल्पावधीत सिनेसृष्टीत स्वत:ची अशी एक खास ओळख निर्माण केली आहे. उत्तम अभिनयासह दोघीही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. सध्या सोशल मीडियावर सारा आणि अनन्याचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये सारा आणि अनन्या वर्कआउट करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत नम्रता पुरोहितने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, ‘सारा आणि अनन्या यांच्या आजच्या वर्कआउटची ही एक झलक आहे. प्रामाणिकपणे, व्यायाम करणे नेहमीच आनंददायक असलं पाहिजे. फिटनेसचे विविध पैलू आहेत’. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सारा आणि अनन्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघांचाही मोठा चाहता वर्ग असून त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. अनेक व्हिडीओ आणि फोटो त्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. त्यानंतर आता दोघींचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, सारा अली खान लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी ती ‘जरा हटके जरा बचके’ दिसली होती. तर अनन्या पांडे ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमामध्ये पाहायला मिळाली. आता लवकरच ती ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात दिसणार आहे.