बॉलीवूडमध्ये यशस्वीपणे पर्दापण करणारी अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या उत्कृष्ट अभिनयासह विनोदी स्वभावासाठीही ओळखली जाते. ती त्या लोकांपैकी एक आहे जे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा परीपूर्ण आनंद घेण्यासाठी तयार असतात. ती फक्त मस्तीच्याच मुडमध्ये असते असे नसून ती स्वतःवरील विनोदावरही दिलखुलासपणे आनंद घेत असते. याबाबत तिने स्वतःचे मीम इंस्टा स्टोरीवर शेअर करत स्पष्ट केले आहे.
साराने शेअर केलेल्या आपल्या विविध मुडस्चे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. या मीमला साराच्या चाहत्यांनीही दिलखुलासपणे लाईकस् दिले आहेत. अनेक जणांनी या मीमवर विनोदी कॉमेंटस् देत तिची स्तुती केली आहे.
वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सारा अली खान “लव आज कल’च्या सीक्वलमध्ये झळकणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले असून हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. याशिवाय वरुण धवनसोबतच्या “कुली नंबर 1′ चित्रपटाचे शूटिंग सारा करत आहे.