अमेरिका आता तुर्कस्तानवरही निर्बंध आणण्याच्या विचारात

वॉशिंग्टन – अमेरिकेने आता तुर्कस्तानवरही निर्बंध आणण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे. तुर्कस्तानने उत्तर सीरियात सुरू केलेली लष्करी कारवाई व तेथील नागरी वस्त्यांवरील हल्ले या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने हा इशारा दिला आहे.

ट्रम्प प्रशासनेचे वरीष्ठ अधिकारी स्टीव्हन म्युनचिन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की अध्यक्ष ट्रम्प लवकरच या निर्बंधांच्या आदेशावर स्वाक्षरी करतील. त्यातून तुर्की सरकारशी संबंधीत कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार अमेरिकेच्या प्रशासनाला मिळणार आहे. हे निर्बंध दोन्ही प्रकारचे असतील असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात नमूद केले.

तुर्की मध्ये सामान्य नागरीकांच्या ठिकाणांवरच हल्ले होंण्याचे प्रकार घडत आहेत., नागरीकांच्या पायाभूत सुविधांवरही लष्कराकडून हल्ले केले जात आहेत. वांशिक व धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे.

त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे असे ते म्हणाले. मात्र अजून हा निर्बंध लागू करण्याचा निर्णय व्हायचा आहे. सध्या तरी हे निर्बंध लागू केलेले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.