अमेरिका सौदीत पाठवणार तीन हजार जवान

वॉशिंग्टन – सौदीतील तेल प्रकल्पांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने सौदीअरेबियाच्या मदतीला तीन हजार जवान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इराणकडून सौदीच्या तेल प्रकल्पांवर हे हल्ले केले जात असल्याचा अमेरिकाचा संशय आहे.

अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी सांगितले की इराणचे संभाव्य आक्रमण रोखण्यासाठी सौदी अरेबियाची संरक्षण क्षमता वाढवण्याची गरज आहे त्यानुसार आम्ही त्यांना ही लष्करी मदत करीत आहोत.

इराणने आपल्या वर्तणुकीत सुधारणा करावी अन्यथा स्वताच्या देशाची वाताहात झालेली त्यांना पहावी लागेल असा इशाराहीं पॉम्पेओ यांनी दिला.

ते म्हणाले की सौदी अरेबिया आणि अमेरिका हे गेले अनेक वर्ष एकमेकांचे मित्र असून आम्ही त्यांना वेळोवेळी लष्करी मदत केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.