Sara Ali Khan Viral Video| अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच मोठे यश संपादन केले आहे. सध्या सारा तिच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सारा जखमी झाली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिच्या या व्हिडिओनंतर चाहत्यांनी साराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
सारा अली खानने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पोट भाजल्याची घटना कवितेच्या शैलीत सांगत आहे. ती मेकअप रूममध्ये बसली असून तिच्या पोटाच्या भाजलेल्या भागावर औषध लावल्याचे दिसत आहे. साराने व्हिडीओ शेअर नेमकं काय घडले ते सांगितले.
व्हिडिओमध्ये सारा मजेशीररित्या ‘जेव्हा तुम्ही दोन चित्रपटांचे प्रमोशन करत असता तेव्हा असा गोंधळ होतो. अब क्या करे, जल गया मेरा पेट, हो गई मैं लेट और सबको करना पड़ा वेट।’ असे म्हणताना दिसते. तर साराने व्हिडिओ शेअर करत ‘मी धडा शिकले आहे. आपण एवढेच म्हणू शकतो की नशीब खराब होते,’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. Sara Ali Khan Viral Video|
View this post on Instagram
साराच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सारा अली खान सध्या ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान साराचे पोट भाजले. असे असूनही तिने चित्रपटाचे प्रमोशन करणे थांबवले नाही.
दरम्यान, सारा अली खानचा ‘ए वतन मेरे वतन’ 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. ज्यामध्ये सारा उषा नावाच्या स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 21 मार्च रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. Sara Ali Khan Viral Video|
तर साराच्या ‘मर्डर मुबारक’ या सिनेमात यात पंकज त्रिपाठी, विजय वर्मा, करिश्मा कपूर, डिंपल कपाडिया, टिस्का चोप्रा आणि संजय कपूर हे कलाकार आहेत. हा चित्रपट 15 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा:
राज्यातील 19 जागांवर लढण्याची काँग्रेसची तयारी; ‘या’ मतदारसंघातील उमेदवारांचा घेतला आढावा