महाबळेश्वर – क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानच्या वाहनतळ चौकात रानगवा मादी व पिल्लू काल दि. ६ रोजी रात्री आढळून आले. त्यांच्या वापरण्यात गावकऱ्यांनी कोणताही अडथळा न आणल्यामुळे ही रानगव्याची मादी पिलासह जंगलात निघून गेली.
चारी बाजूनं जंगलांनी वेढलेला क्षेत्र महाबळेश्वरचा परिसर असून वन्य जीवांबरोबर फार पूर्वीपासून खेळीमेळीच्या वातावरणात राहणं क्षेत्र महाबळेश्वरकरांना नवीन नाही. काल संध्याकाळच्या वेळी वाट चुकलेली रानगव्याची मादी तिचे पिल्लासह क्षेत्र महाबळेश्वर मंदिराशेजारी असणाऱ्या वाहनतळ चौकात आढळून आली. गावकऱ्यांनी कोणताही गोंधळ न करता या मादी व पिलास वाट मोकळी करून दिल्यावर ती रानगाशव्याची मादी तिच्या पिलासहित सुखरूप नजीकच्या जंगलामध्ये निघून गेली.
हे वाचले का ?
”औषध” म्हणून तुम्ही विष तर घेत नाहीत ना बनावट औषधे ‘अशी’ ओळखा…