मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरु होती. प्रसार माध्यमांद्वारे दोन्हही नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत होते. यावेळी आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी सुरु झाल्या होत्या. यानंतर आता राऊत यांनी राणेंना थेट मानहानीचे नोटीस पाठवली आहे. याबाबत स्वतः राऊत यांनी एक ट्विट देखील केले आहे.
नारायण राणे सतत माझ्याविषयी वक्तव्य करत असतात. मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यासोबतच किरीट सोमय्यावर देखील खटला दाखल करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
“नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात.हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी.माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे.कर नाही तर डर कशाला?” अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केले आहे.
नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात.हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी.माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे.
कर नाही तर डर कशाला?जय महाराष्ट्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 3, 2023
माध्यमांशी बोलताना काय म्हणाले नेमकं राऊत यावेळी
राऊत म्हणाले,नारायण राणे म्हणतात, 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझ्या नेमणूक करण्यासाठी राणे काय शिवसेना प्रमुख होते का ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते ? आता राणेंनी मीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना प्रमुख म्हणून निवड केली हेच सांगणं बाकी असल्याचा टोला देखील राऊत यांनी लगावला.