सातारा – पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचे करोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात सॅनिटायझर शॉवर बसवण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरून येणारे नागरिक, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी सॅनिटायझर शॉवर घेऊन कार्यालयात येईल, असे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये सातारा पालिकेच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आला आहे. पालिकेत अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच तेथून केवळ एका व्यक्तीला प्रवेश दिला जातो. आत जाताना हाताला सॅनिटायझर लावणे बंधनकारक होते. मात्र, सुरक्षिततेसाठी शुक्रवारी सकाळी सॅनिटायझर शॉवर बसवण्यात आला. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोरपडे, शरद काटकर व नागरिक उपस्थित होते.