पिंपरी(प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 8) पाच करोनाबाधित रुग्णांची भर पडली. पिंपळे गुरव, रहाटणी, पिरंगुट (ता. मुळशी), नवी सांगवी येथील हे रुग्ण आहेत. त्यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.
रुग्णालयात आज नव्याने 7 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरातील हे रुग्ण आहेत. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 319 जणांना करोनाची लागण झाली. सध्या त्यातील 39 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 25 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 94 जण करोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 155 जणांना अन्य रुग्णालयात हलविले आहे. तर, एकूण 31 जणांचा आत्तापर्यंत उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.