संगमनेर | कत्तलखाण्याविरोधात पुन्हा एकदा एल्गार

पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी ; हिंदू संघटना आक्रमक

संगमनेर (प्रतिनिधी) | तालुक्यात कत्तलखान्यांवर ऐतिहासिक कारवाई होऊन होवून आठ दिवस उलटले तरीही प्रभारी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई झालेली नाही. त्यामुळे आज ( दि. 12 ) प्रांत कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी स्थगीत’ केलेले आंदोलन सुरू केले आहे.

शनिवारी (ता.2) संगमनेरातील जमजम कॉलनी भागातील पाच साखळी कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांनी छापा घालून कारवाई केली होती.

या कारवाईनंतर शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी गेल्या सोमवारी (ता.4) प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनही केलं. तहसीलदारांनी सदर कत्तलखाने 48 तासांत ‘जमिनदोस्त’ करण्याचे मुख्याधिकार्‍यांना आदेश बजावले व श्रीरामपूरच्या अप्पर अधीक्षकांनी सात दिवसांत चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचे आदोलकांना लेखी आश्वासन दिले.

मात्र अद्याप पोलीस निरीक्षकांवरील कारवाईबाबत हालचाली दिसत नसल्याने या संघटनांनी आज पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले असून कारवाई झाल्याशिवाय येथून उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.