मुंबई – चित्रपटांना प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियावर ट्रोल करण ही जणू फॅशनच झाली आहे. लाल सिंग चड्डाला बॉयकॉट केल्यानंतर नेटकऱ्यांनी शाहरुखच्या पठाणला देखील ट्रोल केलं. आता पर्यंत नेटकऱ्यांनी सलमान खानच्या आगामी टायगर ३ चित्रपटाला टार्गेट केल्याचे पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील काही पोस्ट तुफान व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.
Some Massive crimes by selmon chacha
Is this your idol? Guy’s !!!
See this 👇& Point out!!!#BoycottBoycottPathaan #BoycottbollywoodForever #BoycottBramhastra #BoycottTiger3 #BoycottVikramVedha#JusticeForSushantSinghRajput
What Stopping CBI InSSRCase pic.twitter.com/5KfTLNXBQt
— Khairiyat Pucho🦋💫It’s_SSR__#SushantSinghRajput (@SSRMU1986TOF) August 17, 2022
बॉयकॉट टायगर 3 सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स सलमानच्या टायगर 3 या चित्रपटाविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एवढेच नाही तर काही युजर्सनी सलमान खानच्या जुन्या पोस्ट्सनाही लक्ष केलं आहे. युजर्सचे म्हणणे आहे की आता बॉलीवूडचा भाईजान, बादशाह आणि परफेक्शनिस्टचा खेळ संपला आहे.
Close friend says, “Aamir Khan is in a state of shock, the rejection of LSC movie by the audience hit him very hard”
“Nepotism”#BoycottTiger3#BoycottBrahmastra #BoycottVikramVedha pic.twitter.com/dXg0ZBuzRH
— Mahesh Zurange (@zurange_mahesh) August 15, 2022
इतकंच नाही तर काही लोकांनी सलमान खानचे नाव ज्या गुन्ह्यांमध्ये आले होते त्यांचा उल्लेखही केला. शस्त्रास्त्र कायद्यापासून काळवीट शिकार प्रकरणापर्यंत, बॉयकॉट टायगर 3 हा ट्रेंड हाती घेण्यात आला आहे.दरम्यान, सलमान खानचा एक व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा इन्कार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना यूजर्स म्हणत आहेत की ते विसरु शकत नाहीत.
Never forget.. #BoycottTiger3pic.twitter.com/uhjckcEuYF
— KIZIE (@sushantify) August 15, 2022
बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडिया यूजर्सकडून सातत्याने केली जात आहे. त्याचा परिणाम या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.सध्या सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच या चित्रपटाचा एक छोटा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.