सलमान खानने मला घर गिफ्ट दिले नाही : राणू मंडल

मुंबई : कालपर्यंत कोलकाता स्टेशनवर गाणारी राणू मंडल आज एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्यातच बॉलिवुडचा दंबंग सलमान खानने रानू मंडलचे गाणे ऐकून राणूला 55 लाखांचा फ्लॅट गिफ्ट केला. दरम्यान, या वृत्ताविषयी आता खुद्द राणू मंडल यांनीच खुलासा केला आहे. सलमान खानने मला कोणतेही घर गिफ्ट केलेले नाही. त्यांनी मला घर दिले असते तर ते सर्वांसमोर जाहीर केले असते. मीसुद्धा ही बातमी ऐकली होती परंतु या वृत्तावर माझा विश्वास नव्हता असे त्यांनी यावेळी म्हटले.

सलमानला तिच्या चित्रपटात गाण्यासाठी मदत मागितली पाहिजे का? असा सवाल राणू यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले की नाही, मी कोणाशीही मदतीसाठी काही बोलले नाही आणि मी सलमानशीही बोलणार नाही. हिमेश जी यांनी मला गायक म्हणून संधी दिली आहे. मी गायलेली गाणी लोकांना आवडू लागली आणि त्यानंतर मी त्यांना आवडू लागले. मी नेहमीच हिमेशा जींचे आभार मानते असेही राणू यांनी यावेळी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.