कलम 370 : आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाच्या याचिकांवर सुनावणी

नवी दिल्ली : काश्‍मीर प्रकरणावरील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. यावेळी कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, सीताराम येचुरी आणि वायको यांच्यासह 8 जनहित याचिकांवरील निर्णय अपेक्षित आहे. काश्‍मीर खोऱ्यातील बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयही निकाल देण्याचीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करून इथे बंदी आणण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर सुनावणी चालू आहे. आज काश्‍मीर प्रकरणाच्या संदर्भात दाखल केलेल्या 8 जनहित याचिकांवर सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो. जम्मू काश्‍मीरच्या पुनर्रचनेच्या अधिसूचना आणि राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी याचिका दाखल केली असून, त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी ही याचिका दाखल केली.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे आणि न्यायमूर्ती सय्यद अब्दुल नजीर यांच्या तीन सदस्यीय विशेष खंडपीठासमोर जम्मू-काश्‍मीरमधील कलम 37 आणि A 35 अ रद्द करण्याचे आदेश आणि त्यानंतर तेथे लावण्यात आलेल्या निर्बंधांना आव्हान देण्याचे आदेश अनेक याचिका सुनावणीसाठी अगोदरच नियोजित आहेत. तहसिन पूनावाला, पत्रकार अनुराधा भसीन, शेहला रशीद, सीताराम येचुरी, वैको आणि गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक याचिकांवर सुनावणी होईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×