सलमान खान बॉलीवूडमध्ये भाई म्हणून फेमस आहे. तो खरेच भाई असल्याचे त्याचे चाहते म्हणत असतात. अनेक जणांचे करिअर त्याने चौपट केल्याचा आरोपही होत असतो. मात्र, तरीही तो दरियादिल इन्सान असल्याचे सांगणारेही काही कमी नाहीत. असो. आता विषय आहे तो सलमानवर झालेल्या कॉपीच्या आरोपांचा.
View this post on Instagram
त्याचा राधे…हा चित्रपट लवकरच येणार आहे व त्याचे टीझर रिलीज झाले आहे. तेव्हापासून त्याच्यावर आरोपबाजी सुरू झाली आहे. या चित्रपटातील हे गाणे साऊथच्या डीजे चित्रपटातून ढापल्याचे बोलले जाते आहे. संबंधित चित्रपटात तेलगुतील स्टाईलीश स्टार अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले गाणे सलमानने ढापले असल्याचे म्हटले जाते आहे. सीटी मार हे ते गाणे आहे. अर्थात सलमान काही संगीतकार नाही किंवा गायक नाही.
View this post on Instagram
मात्र अनेक संगीतकारांना त्याने बनवले आणि अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला असल्याची पुण्याईही त्याच्या नावावर नोंदवली गेली असल्यामुळे आताच्या सीटी मार ढापण्याच्या या कांडमध्ये त्याचा हात नसेलच असे कोणीही म्हणून शकत नाही. त्यामुळे आता या आरोपांचा त्याला सामना करावाच लागणार.