वाघोली : आव्हाळवाडी तालुका हवेली येथे 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती नारायण आव्हाळे यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके, सरपंच ललिता आव्हाळे, उपसरपंच मंदाताई सातव, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा सातव पाटील, अश्विनी आव्हाळे, राजकन्या आव्हाळे,राहुल सातव,विक्रम कुटे, देवीदास आव्हाळे, शरद आव्हाळे, संदेश आव्हाळे,सागर आव्हाळे, संदिप नाना सातव, मच्छिंद्र सातव, गणेश कुटे पिराजी आव्हाळे, तुकाराम पाटील चंद्रकांत आव्हाळे, दत्तात्रय आव्हाळे, पंकज आव्हाळे, अशोक सातव, निलेश सातव, महेश सातव दत्ता आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर कटके, व हवेली पंचायत समितीचे उपसभापती नारायण आव्हाळे यांनी लसीकरण केंद्र तातडीने सुरु करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहे.
आव्हाळवाडी तालुका हवेली येथील पंचेचाळीस वर्षावरील सर्व नागरिकांनी करोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्या त्या वेळेस उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घ्यावा.
-सुरेखा सातव पाटील (सदस्या , आव्हाळवाडी ग्रामपंचायत)