हाँगकाँग – गेले कित्येक महिने चर्चेत असलेल्या आकर्षक अशा गुलाबी हिऱ्याची तब्बल 39 कोटी 20 लाख डॉलर्सला लिलावात विक्री झाली असून ही आतापर्यंत कोणत्याही हिऱ्याला मिळालेली विक्रमी किंमत मानण्यात येत आहे.
हाँगकाँगमध्ये हा लिलाव पार पडला 11.15 कॅरेटच्या या हिरोचे नाव विल्यमसन पिंक स्टार असे ठेवण्यात आले होते काही वर्षांपूर्वी विक्री झालेल्या दोन गुलाबी हिर्यांच्या नावापासून या हिऱ्याला विल्यमसन पिंक स्टार असे नाव देण्यात आले होते पहिला विल्यमसन नावाचा हिरा 1947 मध्ये ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना त्यांच्या विवाहामध्ये भेटवस्तू म्हणून देण्यात आला होता.
तो हिरा 23.60 कॅरेटचा होता दुसरा हिरा पिंक स्टार नावाने ओळखला जात होता त्याची कॅरेट 59 होती आणि जो अमेरिकेत 2017 मध्ये एका लिलावात 7 कोटी 12 लाख डॉलर्सना विकण्यात आला होता या दोन्ही हिऱ्यांपासून नाव मिळालेला विल्यम्सन पिंक स्टार हा गुलाबी हिरा लिलावासाठी आलेला दुसरा सर्वात होता रंगीत हिर्यांच्या दुनियेत गुलाबी हिरा सर्वात दुर्लभ मानला जातो.
गेल्याच महिन्यात जिनिव्हामध्ये एका पांढऱ्या हिऱ्याची विक्री विक्रमी किमतीला करण्यात आला होता आफ्रिकेतील एका खाणीत सापडलेल्या या पांढऱ्या हिऱ्याचे वजन 228 कॅरेट होते याच लिलावामध्ये एका पिवळ्या रंगाच्या हिऱ्याचीही विक्रमी किमतीला विक्री करण्यात आली होती.