देशातील सर्वात तरुण उद्योगपती पर्ल कपूरने अवघ्या 27 व्या वर्षी मोठे यश संपादन केले आहे. या तरुणाने उद्योगाच्या इतिहासात भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून नाव नोंदवले आहे. तरुण उद्योगपती पर्ल कपूरने अवघ्या तीन महिन्यांत त्यांच्या कंपनीला $1.1 बिलियन (सुमारे 9,129 कोटी रुपये) कमवून दिले आहेत. आज आपण पर्ल कपूर यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात…
कोण आहे पर्ल कपूर?
Zyber 365 चे संस्थापक पर्ल कपूर एक तरुण उद्योजक आहेत. त्यांच्या स्टार्टअपच्या जबरदस्त व्यावसायिक यशामुळे त्यांनी देशातील सर्वात तरुण अब्जाधीशाचा दर्जा प्राप्त केला. ही कंपनी त्यांनी गेल्या वर्षी 2023 मध्ये स्थापन केली होती. Zyber 365 हे वेब आणि AI-आधारित OS स्टार्ट-अप आहे, ज्याने प्रतिष्ठित युनिकॉर्न दर्जा प्राप्त केला आहे. पर्ल कपूरची एकूण संपत्ती $1.1 अब्ज (रु. 9,129 कोटी) आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 90% शेअर्स आहेत. या कंपनीचे मुख्य कार्यालय युनायटेड किंगडममध्ये असून हा व्यवसाय भारतातील अहमदाबाद, गुजरात येथून केला जातो.
अनेक कंपन्यांमध्ये काम केले
पर्ल कपूरने लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातून इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. कपूर हे Web3 तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक नवोदित म्हणून ओळखले जातात. पर्लला आधीच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. अशा परिस्थितीत त्यांनी AI ची वाढती क्रेझ पाहिली आणि मे 2023 मध्ये त्यांचा उद्योजकीय प्रवास सुरू केला आणि Jaiber 365 ची स्थापना केली.
Zyber 365 सुरू करण्यापूर्वी, पर्ल कपूर यांनी Antier Solutions साठी आर्थिक सल्लागार आणि व्यवसाय सल्लागार म्हणून काम केले. ही कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये बिलियन पे टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी उघडली होती.
अवघ्या तीन महिन्यांत अब्ज डॉलर्सची कंपनी स्थापन झाली
या कंपनीने अवघ्या 3 महिन्यांत $1.2 बिलियन (सुमारे 9,840 कोटी रुपये) चे मूल्यांकन गाठले आहे. ही कंपनी भारत आणि आशियातील सर्वात वेगाने वाढणारी युनिकॉर्न म्हणून उदयास आली असल्याचा दावाही केला जात आहे. कपूर यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,129 कोटी रुपये) आहे आणि कंपनीमध्ये त्यांची 90 टक्के हिस्सेदारी आहे.