चिंबळी – श्रीक्षेत्र आयोध्येत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी (दि. 22) होणार आहे. त्यानिमित्त गावागावांत आंनदोत्सव साजारा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील मरकळ, केळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंनदोत्सवा निमित्त परिसरात कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन, मच्छी, चायनीज, देशी-विदेशी दारू विक्री करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या बंदी घालण्यात येत आहे,
अशी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामविकास अधिकार्यांनी सांगितले. हॉटेल, ढाबा व दुकान मालकांनी कुठल्याही प्रकाची दारू, मटण, मच्छी विक्री करू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे