सातारा – अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतापसिंहनगर येथे दारु विक्री प्रकरणी गोरख राउ उदागे (वय 52, रा.प्रतापससिंहनगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 420 रुपये किंमतीच्या 6 बाटल्या जप्त केल्या आहेत.
अपघातप्रकरणी एकावर गुन्हा
सातारा – अपघात प्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वर्ये, ता.सातारा येथे अपघात प्रकरणी शिवतेज ज्ञानेश्वर टिळेकर (वय 20, रा.शाहूपुरी) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चैतन्य पंडीत शिवदे (वय 24, रा.मंगळवार पेठ, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 14 डिसेंबर रोजी घडली आहे. वाहनांचा अपघात झाल्यानंतर ही तक्रार देण्यात आली आहे.
जुगार अड्ड्यावर छाप्यात तिघांवर कारवाई
सातारा – जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुगार प्रकरणी मयुर संजय साबळे (वय 22, रा.प्रतापसिंहनगर), दीपक अशोक साळवे (वय 25, रा.प्रतापसिंहनगर), चंद्रकांत चोरगे (रा.रविवार पेठ) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी रोख 1440 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघनप्रकरणी एकावर गुन्हा
सातारा – आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संजय सायबु पवार (वय 23, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 16 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे.