नवी दिल्ली – उन्हाळ्यात हमखास थंड पेय लोक आवडीने पितात, आणि थंड पेयांमध्ये ‘कोल्ड ड्रिंक’ची ही मागणी असते. पण समजा, तुम्ही एखाद्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये गेला आणि तुम्हाला थंड पेयमध्ये पाल दिली गेली, तर तुमचे काय होईल? साहजिकच… तुम्ही त्यावेळी तुमचे मूड खराब करून घ्याल. अन् हो आरोग्याची काळजी घेत थंड पेये फेकून द्याल.
Here is video of this incidents happens with me…@McDonalds pic.twitter.com/UiUsaqjVn0
— Bhargav joshi (@Bhargav21001250) May 21, 2022
अशीच काहीशी घटना गुजरातमधील अहमदाबादच्या जगप्रसिद्ध मॅकडोनाल्ड आउटलेटमध्ये घडली आहे. मॅकडोनाल्डमध्ये घडलेल्या या किळसवाण्या प्रकारचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
भार्गव जोशी नावाच्या ग्राहकाने सोशल मीडियावर मॅकडोनाल्डने दिलेल्या कोल्ड ड्रिंकमध्ये आढळलेल्या पालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे., त्यानंतर ग्राहकाने AMC कडे तक्रार केली, त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी देवांग पटेल यांनी अहमदाबादमधील ‘सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत’ चाचणीसाठी आउटलेटमधून थंड पेयांचे नमुने गोळा केले. तसेच या व्हिडिओची दखल घेत AMC अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
कोल्ड्रिंकच्या ग्लासमध्ये पाल आढळल्यानंतर अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने (एएमसी) कारवाई करत मॅकडोनाल्डचे हे आउटलेट सील केले. मात्र, ‘Mcdi’ने ग्राहकांना विचित्र गोष्टी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मॅकडी विंचू, अळी आणि बेडूक यांसारख्या प्राण्यांसोबत अन्न दिल्याने चर्चेत आहे.
एएमसीने सांगितले की,’मोठ्या सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी’ रेस्टॉरंट सील केले जात आहे. यासोबतच महापालिकेच्या परवानगीशिवाय पुन्हा सुरू करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, मॅकडोनाल्ड्सने या घटनेवर निवेदनात म्हटले आहे की,’आम्ही आमच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतो. अहमदा बॅड आउटलेटवर कथितपणे घडलेल्या घटनेची आम्ही चौकशी करत आहोत. तथापि, अनेक तपासण्यांनंतर, आम्हाला काहीही चुकीचे आढळले नाही. आम्ही चांगले कॉर्पोरेट नागरिक असल्याने अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत.’