Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. विविध राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान, निवडणूक रॅलीतील नेत्यांच्या वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ताज्या प्रकरणात, द्रमुक नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चेन्नईतील एका रोड शोमधला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मांसाहारासाठी तडफड करावी लागेल –
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये द्रमुक नेते प्रचाराच्या वाहनावर दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला महिला कर्मचाऱ्यांसह इतर लोक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी द्रमुक नेत्याने जनतेला सांगितले की, यावेळची लोकसभा निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा आले तर तुम्हाला पाच वर्ष फक्त डाळ आणि भात खायला मिळेल. मोदी सरकार मटण आणि चिकन खाण्यावर बंदी आणणार, मांसाहारासाठी तडफडावे लागेल. आता तुम्हीच ठरवा की तुम्ही भात, इडली की मटण-चिकन खाणार.
” If Modi is elected again you can only eat Curd rice and Sambar rice, you will be banned from eating mutton, beef and chicken” DMK campaign at Chennai…😑 pic.twitter.com/glzDUR1cLH
— Vishwatma 🇮🇳 ( மோடியின் குடும்பம் ) (@HLKodo) April 1, 2024
19 एप्रिलला लोकसभेच्या 39 जागांसाठी मतदान –
तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत आणि विधानसभेच्या 234 जागा आहेत. निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी राज्यातील सर्व 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान जाहीर केले असून त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. 2019 मध्येही पहिल्या टप्प्यात तामिळनाडूतील सर्व जागांसाठी निवडणुका झाल्या. राज्यात एकूण 33 जिल्हे आहेत आणि राज्याला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमा आहेत.
तामिळनाडूत द्रमुक पक्षाचे सरकार –
तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचे सरकार आहे. येथे एमके स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत. ते तामिळनाडूचे 8 वे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे पुत्र आहेत. पुडुचेरी, तिरुवेल्लूर, चेन्नई उत्तर, तिरुवन्नमलाई आणि तिरुपूर या लोकसभेच्या प्रमुख जागा आहेत.