Ed Sheeran ।हॉलिवूड कलाकारांना भारतीय चित्रपट आणि गाणे यांचीच भुरळ असल्याचे अनेकदा आपण बघितले आहे. असाच एक हॉलिवूड गायक एड शीरन सध्या चर्चेत आहे.एड शीरन हा भारतात फिरायला आला आहे.
त्याने याबाबत त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहे. नुकताच एड शीरनने मुंबईतील एका शाळेत मुलांसोबत मस्तीचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. तर आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘बूटा बोम्मा’ गाण्यावर गायक अरमान मलिकसोबत डान्स स्टेप करतांना दिसत आहे.’
View this post on Instagram
अनेक अभिनेते आणि गायक मुंबईत एड शीरनला भेटत आहेत. अरमान मलिकही त्याच्यासोबत डिनरला गेला होता. जिथे दोघे अल्लूच्या ‘बूटा बोम्मा’ गाण्यावर एकत्र नाचत आहेत. अरमानने कॅप्शनमध्ये शीरनला त्याची आवडती व्यक्ती म्हटले आहे. अरमानने एड शीरनसोबत ‘2 स्टेप’ हे गाणे गायले आहे.
व्हिडिओमध्ये दोघेही अल्लू अर्जुनच्या गाण्यावर थिरकतांना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी शाहरुख खानची सिग्नेचर पोज दिली.या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत.
अरमान व्यतिरिक्त आयुष्मान खुरानाने देखील इंस्टाग्रामवर एड शीरनसोबतचा एक चाहत्याचा क्षण शेअर केला आहे. एड शीरनचा हा दुसरा भारत दौरा आहे.यापूर्वी तो 2017 मध्ये भारतात आला होता. एड शीरन त्याच्या ‘शेप ऑफ यू’, ‘परफेक्ट’, ‘फोटोग्राफ’, ‘मेरी ख्रिसमस’ इत्यादी गाण्यांसाठी ओळखला जातो. परदेशातच नाही तर भारतातही त्यांचे अनेक चाहते आहेत.