काठमांडू : दक्षिण आशियाई स्पर्धेत शुक्रवारी टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत भारताच्या सुतिर्था मुखर्जीने सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीच्या सामन्यात सुतिर्था मुखर्जीने अयहिका मुखर्जी हिचा ४-२ ने ( ८-११, ११-८, ६-२१, ११-४, १३-११, ११-८) पराभव करत विजय संपादित केला.
दरम्यान, सुतिर्था मुखर्जी आणि अयहिका मुखर्जी यांनी उपांत्यफेरीत श्रीलंकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. याआधी सुतिर्था मुखर्जी हिने मिश्र दुहेरीत हरमीत देसाईसह सुवर्णपदक पटकावले होते.