काठमांडू : दक्षिण आशियाई स्पर्धेत शुक्रवारी अँथनी अमलराजने पुरूष एकेरीत अंतिम सामन्यात हरमीत देसाईवर मात करत विजेतेपद पटकावले. सामन्यात सुरूवातीला अमलराज ला खूप संघर्ष करावा लागला. अमलराज ०-३ ने पिछाडीवर होता, पण त्याने आक्रमक खेळ करत हरमीतवर ४-३ने ( ६-११, ९-११, १०-१२, ११-७, ११-४, ११-९, ११-७) मात करत सुवर्णपदक मिळवले.
दरम्यान, याआधी उपांत्य फेरीत हरमीत याने नेपाळच्या पुरूषोत्तमला तर अमलराज याने नेपाळच्या संतू श्रेष्ठचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. याच स्पर्धेत हरमीत याने मिश्र दुहेरीत सुतिर्था मुखर्जीसह सुवर्णपदक पटकावले होते.