कांठमाडू : भारताने बुधवारी तेराव्या दक्षिण आशियाई स्पर्धेत तायक्वांदो क्रीडा प्रकारात वर्चस्व राखत तीन सुवर्णपदकासह एकूण सहा पदकं पटकावली आहेत. यामध्ये लैतिका भंडारी (५३ किलो खालील वजनी गट), जनरेल सिंह ( ७४ किलो खालील वजनी गट) आणि रूदाली बरूआने (७६ किलो वरील वजनी गट) सुवर्णपदक पटकावले आहे.
#TeamIndia continues to shine in #Taekwondo at the 13th #SouthAsianGames2019
🥇#LatikaBhandari Women's Under 53kg#JarnelSingh Men's Under 74kg#RudaliBarua Women's Over 73kg
🥈#Saurav Men's Under 63kg#GaganjotSingh Women's Under 62kg
🥉#ChaitnyaInamdar Men's Over 86kg pic.twitter.com/w2VKLPLZ60
— Team India (@WeAreTeamIndia) December 4, 2019
सौरव याने पुरूषांच्या ६३ किलो खालील वजनी गटात आणि गंगजोत हिने महिलांच्या ६२ किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केलं आहे. चैतन्य इनामदारने पुरूष गटात ८६ किलो वरील वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, मंगळवारी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो खेळाडूंनी १ सुवर्ण आणि ३ कांस्य असे एकूण चार पदकांची कमाई केली होती.