Uddhav Thackeray : अयोध्येत राम मंदिरात भगवान रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ऐतिहासिक क्षण, जेव्हा 500 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान श्री राम अयोध्येतील एका भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समुदाय आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत रामललाच्या श्रीविग्रहाचा अभिषेक पूर्ण झाला.
अयोध्येतील सोहळ्याच्या दिवशी ठाकरे गटाने नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. आज 22 जानेवारीला उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत उपस्थित न राहता नाशिक मधील काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.
त्यापूर्वी आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती करण्यात आली आहे. त्यानंतर ते रामकुंडावर गोदा पूजन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराच्या प्रशासनाने देखील ठाकरे यांच्या स्वागताची तयारी केली आहे. यासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय मंदिरात कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. आज सकाळपासून काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग व गर्दी आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते महापूजा सुरू होण्यापूर्वी मंदिरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला. महापूजा आटोपल्यानंतर भाविकांना पुन्हा देण्यात आला.