नवी दिल्ली – दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप (सॅफ) या स्पर्धेला येत्या 1 ऑक्टोबरपासून मालदीव येथे सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील भारतीय संघाचा सलामीचा सामना बांगलादेशशी होणार आहे.
या स्पर्धेत पाच संघांमध्ये विजेतेपदाची चुरस लागणार आहे. भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक आयगोर स्टायमॅक यांनी 23 जणांच्या संघाची घोषणा केली. मधल्या फळीतील खेळाडू उदांता सिंग याचे संघात पुनरागमन झाले आहे. हिंदुस्थानसह या स्पर्धेमध्ये यजमान मालदीव, बांगलादेश, श्रीलंका व नेपाळ या देशांचा समावेश आहे. हिंदुस्थानचा सलामीचा सामना 4 ऑक्टोबरला बांगलादेशशी होणार आहे. हिंदुस्थानचा संघ मालदीवला दाखल झाला आहे. या
स्पर्धेला 1993 साली सुरुवात झाली. भारताने या स्पर्धेची सर्वाधिक सात विजेतेपदे पटकाविली आहेत. भारताने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011 व 2015 या साली विजेतेपद पटकावले होते, तर 2018 सालच्या स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आले होते.
भारतीय संघ –
गुरप्रीत सिंग, अमरिंदर सिंग, विशाल वैथ, प्रीतम कोटल, सेरीटोन फर्नांडिस, चिंगलसना सिंग, राहुल भेके, सुभाशिष बोस, मंदार देसाई, उदांता सिंग, ब्रॅन्डन फर्नांडिस, लालेंगमाविया, अनिरुद्ध थापा, साहल अब्दुल सामद, जिक्सन सिंग, ग्लेन मार्टीन्स, सुरेश सिंग, लिस्टन कोलॅको, यासीर महंमद, मानवीर सिंग, रहीम अली, सुनील छेत्री, फारुख चौधरी.
भारतीय संघाचे सामने
4 ऑक्टोबर – बांगलादेश (सायं. 4.30 वाजता)
7 ऑक्टोबर – श्रीलंका (सायं. 4.30 वाजता)
10 ऑक्टोबर – नेपाळ (रात्री 8.30 वाजता)
13 ऑक्टोबर – मालदीव (रात्री 8.30 वाजता)