मॉस्को – युक्रेनवर युद्ध लादल्याचा निषेध करत रशियाच्या अनेक ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटूंनी देशत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने हे युद्ध थांबवले तरीही आता भवीष्यात देशात परतणार नसल्याचे या खेळाडूंनी सांगितले आहे.
युद्धाला विरोध दर्शवणारे पत्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना या खेळाडूंनी पाठवले आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या फिडे ग्रां. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झालेले दिमित्री अँड्रीकिन, व्लादिमीर फेडोसीव्ह आणि ऍलेक्झांडर प्रेडके यांनी रशियात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. फेडोसीव्ह आणि डॅनिल युफासमवेत स्पेनमध्ये गेला. लवकरच ग्रॅंडमास्टर किरिल ऍनलेक्सींकोसुद्धा स्पेनकडे रवाना होणार आहे.