मुंबई – आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहल याने आपल्या नावावर एका अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात तीन फलंदाजांना बाद करत अनोखा विक्रम केला.
चहलने पंजाबच्या जॉनी बेअरस्टो, मयंक आग्रवाल आणि भानुका राजपक्षे या फलंदाजांना बाद केले. या तीन बळींद्वारे चहलने स्पर्धेच्या या मोसमात आतापर्यंत 22 बळींची नोंद केली व हा एक विक्रमच ठरला आहे. एकाच मोसमात चार वेळा 20 पेक्षा जास्त बळी घेत त्याने लसित मलिंगा आणि सुनिल नरेन यांनामागे टाकले आहे. मलिंगाने एकाच मोसमात तीन वेळा 20 पेक्षा जास्त व नरेननेही तीन वेळा 20 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.