रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु झाले असून युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान रशिया-युक्रेनच्या युद्धाचे पडताद अनेक देशांवर पडताना दिसून येत आहेत. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. या युद्धामुळे भारताचे अमेरिका-रशियाशी असलेल्या संबंधावर परिणाम होणार का याची भीती वर्तवली जात आहे. अशातच भारताचे रशियाशी असलेले संबंध हे अमेरिका-रशिया संबंधांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यात कोणतीही अडचण नाही. काही फरक पडत नाही असे मोठे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अमेरिकेने असेही म्हटले आहे की त्यांनी रशियाशी संबंध असलेल्या प्रत्येक देशाला नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आपला प्रभाव वापरण्यास सांगितले आहे.
परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, अमेरिकेचे भारताशी महत्त्वाचे हितसंबंध आणि मूल्ये जोडलेली आहेत. प्राइस म्हणाले, “आमचे भारतासोबत महत्त्वाचे हितसंबंध आहेत. आम्ही भारतासोबत महत्त्वाची मूल्ये शेअर करतो, आणि आम्हाला माहित आहे की भारताचे रशियाशी असलेले संबंध अमेरीका-रशियाशी असलेल्या संबंधापेक्षा वेगळे आहेत. आणि त्यात खरोखर काही अडचण नाही.”
त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, “भारताचे रशियाशी मजबूत संबंध आहेत, जे आपले नक्कीच नाहीत. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात भारत आणि रशियाचे संबंध आहेत, जे आमच्यात नाहीत…ज्यांच्याशी संबंध आहेत आणि जे फायदा घेऊ शकतात त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक देशाला त्याचा रचनात्मक वापर करण्यास सांगितले आहे.