मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. आपण हे उपोषण कशासाठी करत आहोत, हे देखील संभाजीराजे यांनी 21 फेब्रुवारी रोजी जाहीर केले. मराठा आरक्षण मिळवणे, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी, ती एक दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज पुन्हा सात मागण्यांवरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले,’मराठा आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं. पण अजून गुन्हे मागे घेतले नाही. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांचा विषय होता. त्यांचं सिलेक्शन झालं त्यांना अजून नियुक्त्या नाही. कोर्टाचा संबंध नाही. ते म्हणतात कोर्टाच्या निर्णयाचा भंग होईल. मला माहीत नाही काय भंग होईल. कुंभकोणी महा कुंभ आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.