मेष : पैशांची चिंता मिटेल
कामाचे व वेळेचे नियोजन करून घर, व्यवसाय व नोकरीत आघाड्या सांभाळाव्या लागतील. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेलच. व्यवसायात फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्या. मनाप्रमाणे कामे होतील. समाधान मिळेल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा तर काढत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष ठेवा. कामात नवीन सुधारणा कराल.
वृषभ :मनोकामना पूर्ण
स्वतः जीवनाचा आस्वाद घेऊन त्यात सभोवतालच्या व्यक्तींनाही सामील करून घ्याल. मनोकामना सफल झाल्याचा आनंद मिळेल. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मिळणाऱ्या फायद्याचेही प्रमाण वाढेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरीत पूर्वी केलेल्या कष्टाचे, कामाचे चीज होईल. आर्थिक वाढ होईल.
मिथुन :आरोग्यमान सुधारेल
भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. एखाद्या गोष्टीचा साकल्याने विचार करून मगच ती हाती घ्याल. व्यवसायातील कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. देणी देऊन डोक्यावरचे ओझे कमी करा. जादा काम करून जादा पैसे मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या सल्ल्याला महत्त्व येईल. सुवार्ता कळेल. आरोग्यमान सुधारेल.
कर्क : ग्रहांची मर्जी
ग्रहांची मर्जी असल्याने तुमच्या सुप्त इच्छा-आकांक्षा वाढतील. व्यवसायातील विरोधकांचा विरोध मावळेल व ते मित्रत्वाची भाषा बोलतील. आर्थिक स्थिती सुधारल्याने हायसे वाटेल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली संगत कामांना गती देईल. नोकरीतील कामात बिनचूक राहून आजचे काम आजच पूर्ण करा. मुलांच्या प्रगतीबाबत चांगली घटना घडेल.
सिंह : यश मिळेल
कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. एखाद्या कामातील यशाचे स्वरूप लक्षात येईल. व्यवसायात पुढाकार घेऊन एखादी धाडसी कल्पना साकार करावीशी वाटेल. त्यात प्रतिष्ठित व्यक्ती व हितचिंतकांची साथही मिळेल. पैशांची चिंता दूर होईल. नोकरीत कोणाची मदत घेण्यापूर्वी त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. क्षमतेनुसार कामे स्वीकारा. वातावरण बदलाने मानसिकता सुधारेल.
ग्रहमान अनुकूल
सध्या ग्रहमान अनुकूल असल्याने तुमचे इरादे बुलंद राहतील. कामांना गती मिळेल. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल. मोठ्या व्यक्तींचा सक्रिय सहभाग लाभेल. वरिष्ठ तुमच्यावर तुमचे आवडते काम सोपवतील. परिणामी, तुम्हाला कामाचा ताण जाणवणार नाही. सोबत पैशांची ऊबही मिळेल. घरात सहजीवनाचा आनंद घ्याल.
तूळ : वेळ मजेत जाईल
कामात चोखंदळ राहून कामे मिळवा. कामात सातत्य टिकवून ठेवून नवीन कामांचे नियोजन करा. व्यवसायात जास्तीत जास्त चांगले काम करून प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न राहील. केलेल्या प्रयत्नांना लगेच फायदा मिळेल, ही अपेक्षा मात्र नको. उधारीपेक्षा रोखीवर भर देऊन कामे मिळवा. मित्र-मैत्रिणी यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
वृश्चिक : प्रगती साधा
या सप्ताहात तुमच्या अंगी असलेल्या गुणांचा व कौशल्याचा योग्य वापर करून प्रगती साधा. व्यवसायात रेंगाळलेली कामे गती घेतील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. सरकारी कामात यश मिळेल. पैशांची तात्पुरती सोय होईल. देणी देता आल्याने समाधान वाटेल. नवीन खरेदीचा आनंद घेता येईल. कलाकार, खेळाडूंना प्राविण्य दाखवण्याची संधी मिळेल.
धनू : मौनव्रत ठेवा
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा; यश मिळेल. व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा इरादा बुलंद राहील. त्यामुळे कामातील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. पैशांची तरतूद करण्यासाठी तुमची शक्ती व बराच वेळ जाईल. नातेवाईक मतलबापुरते तुमच्याकडे आशेने पाहतील; तरी चार हात जरा लांबच. मौनव्रत ठेवणे गरजेचे होईल. महिलांनी प्रकृती सांभाळावी. दगदग कमी करावी.
मकर :ग्रहांची साथ
ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल; त्याचा लाभ घ्या. व्यवसायातील ज्या कामात दिरंगाई झाली होती, ती कामे झपाट्याने पूर्ण होतील. व्यवहारात तुमच्या कामात अनुकूल घटना घडतील. पैशांची चणचण कमी होईल. नोकरीत अनपेक्षित चांगल्या घटनेमुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ. मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबतची चिंता कमी होईल. महिलांना मनाप्रमाणे कामे पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल.
कुंभ : प्रतिष्ठा वाढेल
आळस झटकून कामाला लागाल. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य लाभेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करवून घ्याल. नोकरीत अंगी असलेले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. कामातून तुमचे खास गुण नजरेस पडतील. वरिष्ठांनी सोपवलेल्या कामात युक्तीचा वापर कराल. ती पूर्ण करून दाखवाल. एखादी सवलतही मिळवाल. प्रतिष्ठा वाढेल.
मीन : पूरक ग्रहमान
तुमच्या हौशी व आनंदी स्वभावाला पूरक ग्रहमान लाभत आहे. व्यवसायात साशंकता दूर झाल्याने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन करार-मदार होतील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. पैशांची वसुली होईल. नोकरीत कामानिमित्ताने लांबचा प्रवास घडेल. चांगल्या दर्जाचे काम करून स्वतःमधील वैशिष्ट्य इतरांना दाखवाल. महिलांना मानसिक शांतता लाभेल. कलावंत व खेळाडूंना मान-सन्मानाचे योग येतील.