मेष : ग्रहांची साथ राहील. पूर्वी केलेले कष्ट व प्रयत्नांना यश येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. जादा काम करण्याची तुमची तयारी असेल. नवीन कामे नजरेच्या टप्प्यात येतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. कष्टाच्या प्रमाणात आर्थिक मोबदलाही मिळेल. घरात शुभप्रसंगांची नांदी होईल. सहजीवनाचा आनंद घ्याल. तरुणांना नवीन व्यक्तीशी मैत्री करावीशी वाटेल. महिलांना अपेक्षित यशप्राप्ती होईल.
वृषभ : स्वयंसिद्ध राहाल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्रिय व्हाल. व्यवसायात नियोजनावर भर राहील. प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक पावले टाकाल. आर्थिक तणाव जाणवेल. उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब कराल. नोकरीत नवीन कामासाठी निवड होईल. नवीन ओळखी होतील. प्रवासाचे योग संभावतात. पदोन्नतीही मिळेल. घरात प्रियजनांच्या जीवनातील चांगली घटना घडेल.
मिथुन : कर्तव्यपूर्तीसाठी पुढे येऊन कामाला लागाल. तुमच्यातील उर्मी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. त्यामुळे नियोजनही कराल. व्यवसायात बदलत्या काळानुरूप बदल करून नवीन उपक्रम हाती घ्याल. केलेल्या कष्टाचे चीज व कौतुक होईल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. पैशाची तजवीज करावी लागेल. हितचिंतकांची मदत याकामी होईल. घरात काही सुखाचे क्षण येतील. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. अनपेक्षित लाभाची शक्यता.
कर्क : सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. त्यामुळे तुम्ही संभ्रमावस्थेत राहाल. व्यवसायात पैशाच्या तंगीमुळे कामाला मर्यादा येतील. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. मात्र, भावनेच्या भरात कोणतेही आश्वासनं देऊ नका. “आपले कामं बरे की आपण बरे’ हे धोरण ठेवा. घरात सर्वांचे तंत्र सांभाळणे कठीण आहे. प्रकृतीचीही कुरबूर राहील.
सिंह : अंथरुण पाहून पाय पसरा. वास्तववादी दृष्टिकोन उपयोगी पडेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. नवीन व्यक्तींशी हितसंबंध दृढ होतील. त्यामुळे जुने हितसंबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष द्या. पैशाची चिंता नसेल. नोकरीत कष्ट वाढले तरी कामाचा आनंद मिळेल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. घरगुती समारंभ किंवा छोटीशी सहल आखाल.
कन्या : अनपेक्षित मार्गाने साथ मिळाल्याने तुम्हालाही थोडा आश्चर्याचा धक्का बसेल. व्यवसायात कोणावरही विसंबून न राहता कामे हातावेगळी करा. हाती असलेल्या पैशाचा वापर उत्पादन व फायदा वाढवण्यासाठी करा. सलोख्याने सर्व प्रश्नांची उकल करा. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून कामाची मागणी करा व गरजेनुसार कामांना प्राधान्य द्या. नोकरीत कामात गुप्तता राखा. बदल किंवा बदलीची दाट शक्यता. घरात वेळेचा दुरुपयोग करू नका.
तुळ : शक्ती आणि युक्ती यांचा योग्य समन्वय करून यश द्विगुणित कराल. व्यवसायात प्रयत्न करीत असलेल्या कामात चांगली कलाटणी मिळेल. त्यामुळे तुम्हीही उत्साही बनाल. योग्य व्यक्तींची योग्य वेळी मिळालेली मदत उपयोगी पडेल. पूर्वी झालेल्या कामाचे पैसे हाती येतील. नोकरीत नवीन संधीसाठी तुमची निवड होईल. त्यामुळे तुमची जबाबदारीही वाढेल. प्रतिष्ठा मिळेल, बेकारांना नवीन नोकरीच्या कामात यश येईल.
वृश्चिक : घर व व्यवसाय नोकरी याकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात नवीन कामांमुळे दगदग वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करण्यासाठी बॅंका व वित्तीय संस्था यांची मदत घ्यावी लागेल. नोकरीत कामात आलेली शिथिलता तुम्हाला वेगळीच दिशा देतील. वरिष्ठ वेगळ्या प्रकारची कामगिरी सोपवतील. घरात वादाचे प्रसंग येतील. तरी तडजोडीने प्रश्न मार्गी लावा. प्रकृतीचे तंत्र सांभाळा. तरुणांनी अतिधाडस करू नये.
धनु : सभोवतालच्या व्यक्तींची म्हणावी तशी मदत न मिळाल्याने तुम्हाला स्वयंभू बनावे लागेल. व्यवसायात कंबर कसून कामाला सिद्ध व्हाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठीभेटी लाभदायी ठरतील. त्यांचेशी चर्चा करून कामाचे स्वरूप समजून घ्या. भरपूर काम करायची तयारी ठेवा. कामामुळे सतत धावपळ करावी लागेल. यश मात्र हमखास मिळेलच. नोकरीत तुमच्या पसंतीचे काम सोपवले जाईल. प्रवासाचे योग. नव्या ओळखी होतील. कुटुंबासमवेत लांबच्या प्रवासाचे बेत ठरतील.
मकर : ग्रहांची मदत मिळेल. व्यवसायात कामे मार्गी लागल्याने काही निर्णय घेऊ शकाल. केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. जोडधंदा असणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. नोकरीत कामाचा बोजा असला तरी सहकाऱ्यांची मदत मिळेल. त्यामुळे कामाचा भार हलका होईल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. घरात शुभकार्य ठरेल. पाहुण्यांची सरबराई करण्यात बराच वेळ जाईल. विवाहोत्सुकांचे विवाह जमण्यास अनुकूल काळ आहे. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.
कुंभ : तुम्हाला अपेक्षित सुधारणा या सप्ताहात होईल. त्यामुळे तुमचा जीव भांड्यात पडेल. व्यवसायात फायद्याचे प्रमाण वाढवणारी कामे मिळतील. त्यातून भरपूर पैसे मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. भांडवलाची तरतूद हितचिंतक मित्रमंडळी किंवा अन्य मार्गाने होऊ शकेल. नोकरीत तुमच्यातील गुणांना व बुद्धिमत्तेला वाव देणारे काम मिळेल. अवघड कामातही यशश्री मिळवाल. घरात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. समारंभ ठरतील. चांगली कामे हातून होतील.
मीन : माणसांची पारख करणे गरजेचे होईल. त्यामुळे जरा लांबच राहा. व्यवसायात विसंबून न राहता हातातील कामे वेळेत संपवा. नवीन कामाची संधी तुमचे लक्ष वेधून घेईल. आवश्यक ती ताळेबंदी करून मगच निर्णय घ्यावा. नोकरीत कंटाळवाणे काम संपल्याने हायसे वाटेल. वरिष्ठांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. कामात गुप्तता राखा. घरात खर्च आटोक्यात येतील. मनाप्रमाणे काम करता येईल. मनोबल उत्तम राहील. प्रियजनांचा सहवास आनंद देईल.