मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. मात्र, आता सर्वच स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत असून, गुन्हा दाखल करण्यात करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी टीका केली आहे. “आमच्या हिंदू देवी-देवतांवर आणि संत परंपरेवर टीका करणाऱ्यांना पक्ष भाड्याने चालवायला दिला की काय परिणाम होतो, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. देवी-देवतांचा आणि संतांचा अपमान करणारे आज पक्षाचे प्रवक्ते म्हणून राज्यभर भटकत आहेत. तसेच, आमच्या देवी-देवतांवर गरळ ओकत आहेत,” असे तुषार भोसलेंनी म्हटलं होतं.
मात्र, आता त्यांच्या या व्यक्तवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली-पाटील ठोंबरे यांनी तुषार भोसलेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. “सुषमा अंधारेंनी शिवसेना प्रवेश करून पाच महिने झाले. त्यांचे व्हिडीओ, ते फार जुने आहेत. तेव्हा वारकरी समाज आणि ह.भ.प महिला कुठे होत्या. हे वारकरी समाजाचे नसून शिंदे आणि भाजपाने तयार केलेले आहेत. वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलं आहे. ते स्वत:ला वारकरी समजतात, पण ते वारकरी नाही आहेत”. असं त्या म्हणाल्या आहेत.