Rubina Dilaik – ‘बिग बॉस सीझन 14’ ची विजेती रुबिना दिलैकने अलीकडेच सोशल मीडियावर चाहत्यां प्रेग्नेंट असल्याची बातमी शेअर केली. या घोषणेनंतर हे रुबिना आणि अभिनव अनेकदा त्यांच्या फोटोशूटमुळे तर कधी त्यांच्या व्लॉगमुळे चर्चेत असतात.
Don’t come and comment on my Instagram….. its NOT GYAN , Mr. Intelligently Dumb Vipul Shrisath! Aapse se zyaada hum tyohaar manaatein hain, par doosron ko takleef dekar nahi …. pic.twitter.com/9bs9DxEABv
— Rubina Dilaik (@RubiDilaik) November 15, 2023
पण नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने रुबीनाने एक ट्विट केले होते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र रुबिनाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल आहे.
रुबिनाला ट्रोल करताना लोकांनी तिला हिंदूविरोधीही म्हटले आणि तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही सुरू झाली. हे सगळे ट्रोल पाहून रुबीनानेही सर्व ट्रोल करणाऱ्यांवर प्रत्युत्तर देत लिहिले की,’मी हिंदू विरोधी आहे का? तिने पुढे ट्विट केले की, हे ट्विट त्यांच्यासाठी आहे जे असे वागत आहेत. या सर्वांना मी सांगू इच्छितो की, दिवाळी संपली आहे, त्यामुळे तुम्हीही फटाके फोडणे बंद करा. 10 नोव्हेंबरपासून पहाटे 3 वाजल्यापासून सर्वत्र फटाके फोडले जात आहेत. हा शेवटचा टप्पा आहे. एकीकडे वायू प्रदूषण तर दुसरीकडे ध्वनी प्रदूषणही होत आहे. आमचीही झोप उडाली आहे. रुबिनाच्या या ट्विटवर लोकांनी जोरदार कमेंट केल्या. तिने ट्विटमध्ये अप्रत्यक्षपणे तिला ट्रोल करणाऱ्यांना प्रतिउत्तर दिल आहे.
Anti Hindu ??? Are you guys SERIOUSLY OUT OF YOUR MIND 🙄 pic.twitter.com/5Rqp9cHiRh
— Rubina Dilaik (@RubiDilaik) November 15, 2023
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. पांढऱ्या रंगाच्या हटके लूकमध्ये तिने केलेले हे फोटोशूट चांगलेच चर्चेत आले होते. रुबिनाच्या मॅटर्निटी फोटोशूटची थीम व्हाईट होती. या फोटोशूट साठी रुबिनाने आणि पती अभिनव शुक्ला दोघांनी पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान केले होते. अनिभवने पांढरा टी-शर्ट, त्यावर पांढरा कोट आणि पँट घातला होता. या लूकमध्ये दोघेही सुंदर दिसत होते.