Sonali Kulkarni | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यातील अकरा मतदार संघात मतदान पार पाडले जात आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. अनेक अनेक सेलेब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
यातच आता मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मतदान केले आहे.निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या मतदान केंद्रावर जाऊन सोनालीने मतदान केले आहे.
यावेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदानाचे आवाहन केले आहे. “कर्तव्य आणि अधिकार नाण्याच्या दोन बाजू. कर्तव्य पार पाडल्या शिवाय अधिकार मिळत नाही. लक्षात असूद्या. मतदान करा,”असे तिने म्हंटले आहे. याशिवाय तिने म्हंटले की, ‘लोक मतदान करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतात. लोकांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. त्यामुळे कोणाला मत द्यावे, का द्यावे, त्यातून का होणार आहे पुढे असे बरेच प्रश्न लोकांसमोर निर्माण झाले आहेत. या प्रश्नांना उत्तर द्यायचे असेल, तक्रारी करायच्या असतील तर मतदानाचा हक्क बजावणे महत्त्वाचे आहे.’ Sonali Kulkarni |
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता सुबोध भावे याने देखील पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह मतदानाचे कर्तव्य पार पडले. “बदल घडला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या. मला राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही. कारण त्याविषयी शून्य आवड आहे. पण मला माहिती आहे हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते मी पार पडलं. त्यामुळे मतदान करा,” असं आवाहन सुबोध भावेने केले आहे.