Tabbu Debut Hollywood| अभिनेत्री तब्बू बॉलीवूडनंतर हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवण्यास सज्ज होणार आहे. नुकताच तब्बूचा करीना कपूर आणि क्रिती सेननसोबतचा ‘क्रू’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. यापूर्वी देखील तिने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यानंतर तब्बू एका अमेरिकन ‘ड्यून: प्रोफेसी’ नावाच्या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डून: प्रोफेसी’ या सीरिजमध्ये, सिस्टर फ्रान्सिस्काची भूमिका तब्बू साकरणार आहे. 2019 मध्ये ही टीव्ही सीरियल ‘ड्यून- द सिस्टरहुड’ नावाने सुरू झाली. ही सीरियल ब्रायन हर्बर्ट आणि केविन जे. अँडरसन यांच्या ‘सिस्टरहुड ऑफ ड्युन’ या पुस्तकावर आधारित आहे. ही सायन्स आणि फिक्शन ड्रामावर आधारित या सीरियलची कथा आहे. ही कथा एका वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, या सीरीजची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. याआधी तब्बूने हॉलिवूडमधील ‘द नेमसेक’ आणि ‘लाइफ ऑफ पाई’ या दोन प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. तब्बूचा शेवटचा हॉलिवूड प्रोजेक्ट ‘लाइफ ऑफ पाई’ 2012 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात तब्बूसोबत इरफान खान, आदिल हुसैन आणि सूरज शर्मा यांनीही काम केले होते. Tabbu Debut Hollywood| तब्बूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर, लॉकडाऊननंतर तब्बूने अनेक चांगले चित्रपट केले. ‘भूल भुलैया 2’, ‘दृश्यम 2’, ‘भोला’ आणि ‘क्रू’मध्ये तिने केले आहे. तब्बू लवकरच अजय देवगणसोबत ‘औरों में कहाँ दम था’ या चित्रपटात दिसणार आहे. तब्बूने आतापर्यंत सात फिल्मेफेअर पुरस्कार, दोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राष्ट्रीय फिल्म फेअर पुरस्कारांवर नाव कोरले आहे. Tabbu Debut Hollywood| हेही वाचा: नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू २ वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी