मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. लवकरच तमन्ना आणि विजय लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे दोघे आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याचे म्हंटले जात आहे.
काही रिपोर्टनुसार, तमन्ना आणि विजय त्यांच्या नात्याला नवं नाव देण्याचा ते विचार करत आहेत. तमन्नावर लग्न करण्यासाठी तिच्या आई-वडिलांचा दबाव आहे, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या डेटिंगच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या.
त्यानंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आनंदी झाले आहेत. तमन्ना आणि विजयचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज 2’ या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकत्र काम केलं होतं. या सीरिजमधील त्यांच्या बोल्ड सीन्सची चांगलीच चर्चा रंगली. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरले होते. त्यानंतर अनेकदा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.