रांजणगाव गणपती – येथील पोलीस स्टेशनच्या वतीने 31व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत कारेगाव बस थांबा येथून 31व्या रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 (11 जानेवारी ते 17 जानेवारी) ची सुरुवात केली.
त्यामध्ये वाहतूक प्रबोधन पर बॅनर्स बनवून ते वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चालकांचे दर्शनी भागावर लावण्यात आले. 1000 पत्रके छापून घेऊन त्याचे वाटपास सुरूवात केली. नियमभंग करणारे चालकांना गुलाबपुष्प देऊन उपहासात्मक सत्कार करून त्यांचे प्रबोधन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनधिकृतपणे बंद फोडलेले दुभाजक बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल कदम, हवालदार अनिल चव्हाण, कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमोडे, उमेश कुतवळ, पोलीस मित्र व इतर ग्रामस्थ असे हजर होते. रांजणगाव ःयेथे 31व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत नियमभंग करणारे चालकांना गुलाबपुष्प देऊन उपहासात्मक सत्कार करून त्यांचे प्रबोधन केले.